टोल टेंडरचा नगराध्यक्ष नलावडे यांनी टाकलेला खडा पारकर यांना बरोबर लागला

टोल टेंडरचा नगराध्यक्ष नलावडे यांनी टाकलेला खडा पारकर यांना बरोबर लागला

*कोकण Express*

*टोल टेंडरचा नगराध्यक्ष नलावडे यांनी टाकलेला खडा पारकर यांना बरोबर लागला*

*भाजपा नगरसेवक शिशीर परुळेकर यांचा टोला*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ज्यांनी आतापर्यंत कणकवली रेस्ट हाऊसच्या आंब्याखाली बसून टेंडर मॅनेज करण्याचे काम केलं व या टेंडर मॅनेज च्या सवयी मुळेच ज्यांना स्वतःच्या भावाने देखील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत तिकीट देखील दिलं नाही अशा नगरसेवक कन्हैया पारकर यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावर टेंडर च्या अभ्यासाच्या आरोप करणे हे हास्यास्पद आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी टेंडर चा झोल झाला अस सांगितलं पण कुणाचंही नाव घेतले नाही. मात्र नगराध्यक्षांनी टाकलेला हा खडा कन्हैया पारकर यांना परफेक्ट बसला. व त्यामुळे कदाचित पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनीच या संदर्भात भाष्य केल्यानंतर कन्हया पारकर यांना पुढे करून पत्रकार परिषद घ्यायला लावली असावी. पण यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी टोल वसुली जिल्ह्यातील जनतेच्या माथी मारली जात आहे या वसुली च्या मागे नेमका कोण आहे हे कन्हैया पारकर यांच्या जळफळाटामुळे आता स्पष्ट झाले. त्यामुळे आता जिल्ह्यातील जनतेला या टोल मागे कोणाचा हात आहे हे नाव आम्हाला उघड करण्याची गरज नाही ते जनतेला कन्हैया पारकर यांनी समजावून सांगितले आहे त्याबद्दल आम्ही कन्हैया पारकर यांचे अभिनंदन करतो असा टोला श्री परुळेकर यांनी लगावला.
यांचे आयुष्य रेस्ट हाऊस जवळ बसून टेंडर मॅनेज करण्यात गेले त्यांनीच टेंडर च्या अभ्यासावर बोलावे हेच हास्यास्पद आहे. टेंडर च्या सेटलमेंट मुळे कन्हैया पारकर यांना जनतेने घरी बसवलं आणि त्यांना पक्षाने व त्यांच्या भावाने देखील तिकीट नाकारलं. ज्या पारकर यांनी आपली कारकीर्द टेंडर मॅनेज मध्ये घालवली त्या पारकर यांनी शिवसेनेमध्ये गेल्यानंतर देखील हीच परंपरा सुरू ठेवली. यामुळेच शिवसेनेच्या कार्यालयाला दलाल भवन हे नाव पडलं. ओसरगाव टोलनाक्यावरील टेंडर करिता एकूण 4 टेंडर भरली गेली होती. त्यातील 2 नंबरला राहिलेले टेंडर कुणाचे होते. व मंजूर झालेल्या टेंडर ठेकेदारास सोबत सेटलमेंट कुणाची झाली. या टेंडर मधील सहभाग स्पष्ट होऊ नये म्हणूनच पारकर यांनी पत्रकार परिषद घेतली की काय? असा सवाल श्री परुळेकर यांनी केला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी एमएच 07 च्या वाहनांना टोलमाफी मिळाली पाहिजे ही भूमिका सर्वप्रथम घेतल्यानंतर शिवसेना व कन्हैया पारकर हे बोलायला सुरुवात झाली. तोपर्यंत पारकर झोपले होते काय?. पारकर यांनी नगराध्यक्ष नलावडे यांना शिवसेनेसोबत आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन केले. त्या आव्हानाचा विचार केला असता पारकर यांच्यासोबत जे – जे गेले ते राजकारणात देशोधडीला मिळाले. त्यामुळे पारकर यांच्या बरोबर जाण्याचा मूर्खपणा येत्या काळात कोणीही करणार नाही. व हे कन्हैया पारकर यांच्या पक्षाच्या सर्वच नगरसेवकांना माहिती असल्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेला कणकवलीतील एकही नगरसेवक देखील उपस्थित राहिला नाही. कोकण पर्यटन विकास समितीचे बिनकामाचे व बिन अधिकाराचे उपाध्यक्षपद कन्हैया पारकर यांचे बंधू संदेश पारकर यांना मिळाले. मात्र हे पद देत असताना आम्ही सातत्याने शिवसेनेकडून पद दिले नाही ही टीका केल्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या सोबत बॅग सांभाळण्यासाठी संदेश पारकर यांना दिलेले हे चॉकलेट आहे असा टोला श्री परुळेकर यांनी लगावला. ज्या पारकर यांना पर्यटन समिती उपाध्यक्ष करण्यात आले त्या पारकर यांनी टोल नाक्यावर महामंडळ उपाध्यक्ष असा उल्लेख करून आपले बोर्ड लावले. जर अधिकार नसलेल्या समिती उपाध्यक्षपदी राहायला संदेश पारकर यांना कमीपणा वाटत होता मग हे पद घ्यायचे तरी कशाला? असा सवाल श्री परुळेकर यांनी केला. ओसरगाव टोलनाक्यावरील एमएच 07 वाहनांना टोलमाफी द्यावी ही भूमिका नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जाहीर केल्यानंतर त्यावर पालकमंत्री किंवा खासदार हे बोलले. मग कन्हैया पारकर यांच्या म्हणण्याप्रमाणे निदान पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत हे टोलसंदर्भात नगराध्यक्ष यांनी सुरुवातीला घेतलेल्या भूमिकेला जाहीरपणे पाठिंबा देतील काय? असा सवाल श्री परुळेकर यांनी केला. संदेश पारकर यांची पर्यटन विकास समितीवर निवड झाली आणि सिंधुदुर्गातला दरवर्षी पावसाळा सुरू होईपर्यंत चालणारा पर्यटन हंगाम केव्हा नवे तो यावर्षी पाऊस सुरू होण्याच्या पूर्वीपासूनच चार महिन्यांत करता बंद करण्याची वेळ आली. हा या समितीच्या बिन अधिकार असलेल्या पदाचा पायगुण आहे असा टोला देखील श्री परुळेकर यांनी लगावला तसेच कन्हैया पारकर यांची पक्षात कुणी दखल घेत नाही त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची नगराध्यक्षांना कोणतीच गरज नाही एम एच झिरो सेवन वाहनांना केंद्रीय मंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून टोल माफी मिळवून देण्यासाठी नगराध्यक्षांचा प्रयत्न आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!