*कोकण Express*
*फोंडा वैभववाडी मार्गाचे नूतनीकरण झाल्याने भरधाव वाहतूक सुरू*
*वाहनचालकांनी सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे लोरे नं 2 सरपंच विलास नावळे यांचे आवाहन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
फोंडा वैभववाडी हा रस्त्याचे नूतनीकरण झाल्यामुळे या मार्गावर फोंडयाहून किंवा वैभववाडीहुन येणारी वाहने अतिशय वेगाने जात आहेत. मे महिन्याच्या काळात सर्व चाकरमानी गावाकडे येत आहेत. वाहनचालक अतिशय वेगाने गाड्या चालवत आहेत. लोरे नं 2 गावातील रस्ते हे या मुख्य रस्त्याला जोडलेले आहेत प्रत्येक वाडीतून छोटे छोटे रस्ते या रस्त्याला येऊन मिळतात त्यामुळे गावातील सर्व वाहनचालकांनी मुख्य रस्त्याला येताना खबरदारी घेत अतिशय सावधगिरी ने आपलं वाहन चालवावे आणि संभाव्य अपघात टाळावेत असे आवाहन लोरे नं 2 सरपंच विलास नावळे यांनी केले आहे. लोरे नं 2 गावातील आतील छोटे रस्ते हे झाडाझुडपातून येत असल्याने मुख्य रस्त्यावरच काहीच दिसत नाही. आपल्या छोट्या चुकीमुळे अपघात होऊ शकतो. म्हणून सर्व वाहनचालकांनी आपल्या ताब्यातील आपली गाडी सावकाश लक्षपूर्वक चालवावी तसेच अगदी छोट्या वयातील मुले सुद्धा गाड्या चालवत आहेत त्यांच्या सर्व पालकांनी आपल्या मुलांना खबरदारीचा सूचना कराव्यात असं आवाहन ही सरपंच नावळे यांनी केले आहे.