महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी फोंडाघाट येथील संशयिताला जामीन

महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी फोंडाघाट येथील संशयिताला जामीन

*कोकण Express*

*महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी फोंडाघाट येथील संशयिताला जामीन…

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग करत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी संजय मधुकर फोंडेकर (वय ५५, मूळ रा. फोंडाघाट,सध्या रा. कुर्ला-मुंबई) याची पंधरा हजाराच्या सशर्थ जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला.

संजय फोंडेकर याच्याविरोधात याच्याविरूध्द कणकवली पोलिसात भादवी ३५४, ३५४ अ, (१), (एक), ३५४ ब,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ मे रोजी रात्री १ वा. च्या सुमारास घडली. संशयिताला आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. याबाबत महिलेने दाखल केलेल्या फिर्यादी नुसार, त्या महिलेचा पती गंभीर आजाराने त्रस्त असल्याने त्याला उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले होते. मात्र मुंबईला त्यांची राहण्याची सोय नसल्याने तिच्या पतीच्या ओळखीचा असलेल्या संशयित संजय फोंडेकर याच्याकडे ते मुंबईत राहिले. पतीचे ऑपरेशन झाल्यानंतर ती गावी आली. १ मे रोजी चेकअपसाठी तिचे पती मुंबईला गेले होते. तर संशयित हा गावी आला होता. त्याच्या मूळगावी कोणी नसल्याने तो त्या महिलेच्या घरी राहण्यासाठी आला. ७ मे रोजी रात्री जेवण आटोपून तिची दोन मुले व संशयित हॉलमध्ये झोपले. तर ती महिला आतल्या खोलीमध्ये पलंगावर झोपली होती. भाचा तेथेच खाली जमिनीवर झोपला होता. रात्री १ वा. च्या सुमारास त्या महिलेच्या पोटावर कुणीतरी हात फिरवत असल्याची जाणीव तिला झाली असता तिने उठून पाहिले. त्यावेळी संशयित संजय फोंडेकर याने तिचे तोंड दाबून ओरडलीस तर तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकेन अशी धमकी दिली. त्यावेळी तिने भाचा व मुलांना हाक मारून उठवले. त्यानंतर संशयित संजय फोंडेकर हा मुलांना ढकलून बाहेर पळून गेला. याप्रकरणी त्या महिलेने संजय फोंडेकर याच्याविरूध्द तक्रार दिली होती. संशयित संजय फोंडेकर याला फोंडाघाट येथून ताब्यात घेतले. त्याला काल सायंकाळी अटक करण्यात आली. आज त्याला हजर केले असता ५ दिवसात जामीन देण्याच्या अटीवर, व तपासकामात ढवळा ढवळ करू नये, पोलिसांना तपासात सहकार्य करणे, साक्षीदारावर दबाव आणू नये, पोलीस सांगतील त्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये हजर रहावे या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!