नांदगाव तिठा, ओटव फाटा सर्व्हीस रस्त्यासाठी १४ मे ला आमरण उपोषण

नांदगाव तिठा, ओटव फाटा सर्व्हीस रस्त्यासाठी १४ मे ला आमरण उपोषण

*कोकण Express*

*नांदगाव तिठा, ओटव फाटा सर्व्हीस रस्त्यासाठी १४ मे ला आमरण उपोषण*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नांदगाव तिठा व ओटव फाटा येथील सर्विस रस्ते अद्यापही झालेले नाहीत. यापूर्वी तिने वेळा उपोषण केले, त्यावेळी प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देत बोळवण करण्यात आली. हे सर्व्हिस रस्ते अपूर्ण असल्यामुळे अपघात होऊन जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी न लागल्यास नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ १४ मे रोजी पुन्हा नांदगाव तिठा येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी कणकवली प्रांत अधिकारी व महामार्ग प्राधिकरणला दिला आहे.आहे.यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अपघात होऊन जीव जाण्याची वाट पाहता का? अशी प्रशासनाला विचारना केली.

नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कणकवली प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.या निवेदनात नांदगाव येथील मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा व नांदगाव तिठा या दोन्ही ब्रिज च्या जवळील एकाच साईटचे सर्व्हस रस्ता झाला आहे. तर दुसऱ्या बाजूचा साईट रस्ता न झाल्याने विरुध्द दिशेने वाहने न्यावी लागत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून काही वेळा अपघात झालेले सुध्दा आहेत . यामुळे देवगड ला व नांदगाव तिठा येथे जाणारी वाहने विरुध्द दिशेने न्यावी लागत आहेत. तसेच मुंबई च्या दिशेने जाणारी वाहने यात लोकल एस.टी वाहतूकही नांदगाव तिठा येथे न येता पुलावरून जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे . प्रवाशांना कोळंबा मंदिर समोर पुल चालू होते येथे उतरले जाते. यामुळे तेथून वयोवृध्द प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे . तसचे इतरही गटार व्यवस्था व वहाळ या ठीकाणी अर्धवट स्थितीत कामे टाकलेली आहेत.ती कामे पावसाळा अगदी तोंडवर आला तरी अपूर्ण आहे. सर्व कामे येत्या आठ दिवसात मार्गी लावावी,अन्यथा नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच , ग्रामस्थांसहीत आमरण उपोषणला बसणार असल्याचे म्हटले आहे.

या निवेदनावर गुरुप्रसाद वायंगणकर,भाई मोरजकर, तुकाराम तुपट , सुभाष बिडये, कमलावर पाटील, ऋषिकेश मोरजकर, भगवान लोके पत्रकार,गणेश खोत,भूषण म्हसकर,नितेश म्हसकर आदी ग्रामस्थांनी सह्या करत मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!