वैभववाडी युवासेना तालुका समन्वयपदी दत्तात्रय परब

वैभववाडी युवासेना तालुका समन्वयपदी दत्तात्रय परब

*कोकण Express*

*वैभववाडी युवासेना तालुका समन्वयपदी दत्तात्रय परब*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

युवासेना तालुका समन्वयक पदी खांबाळेचे दत्तात्रय परब यांची निवड झाली आहे. युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र श्री. परब यांना दिले आहे.

युवासेनेची संघटनात्मक बांधणी सुरू आहे. जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी तालुक्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यावर अधिक भर दिला आहे. आज तालुका समन्वयक पदी दत्तात्रय परब यांची श्री नाईक यांनी निवड केली.निवडीनंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांच अभिनंदन केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके,अल्पसंख्याक तालुका प्रमुख जावेद पाटणकर, माजी बँक संचालक दिगंबर पाटील, नगरसेवक मनोज सावंत, माजी सभापती रमेश तावडे, अंबाजी हुंबे, संभाजी रावराणे, युवासेना तालुका प्रमुख अतुल सरवटे, लोरे सरपंच विलास नावळे, गौस पाटणकर यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!