माजी आमदार प्रमोद जठार यांच्या ५७ व्या वाढदिवसा निमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

माजी आमदार प्रमोद जठार यांच्या ५७ व्या वाढदिवसा निमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

*कोकण Express*

*माजी आमदार प्रमोद जठार यांच्या ५७ व्या वाढदिवसा निमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव*

*कोणतीही कटूता मनात न ठेवता कार्य करणारा नेता: —आम. नितेश राणें कडून कौतुक*

*कासार्डे : संजय भोसले*

कोकणच्या विकासासाठी आग्रही असणारा व कोणतीही कटुता मनात न ठेवता तळमळीने काम करणारा नेता अशी स्वतःची ओळख निर्माण केलेला, ग्रीन रीफायनरी झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडणारा नेता. अशा शब्दांत आम. नितेश राणे यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते कासार्डे तिठा या ठिकाणी आयोजित केलेल्या माजी आमदार प्रमोद जठार यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले गेले होते .त्यावेळी त्यांनी वरील प्रकारचे उद्गार काढले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली ,दाजी साळकर ,डॉक्टर .अनिल नेरूरकर , आम.राजन म्हापसेकर (गोवा) आदी मान्यवर उपस्थित होते.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा केलेल्या, माजी आमदार प्रमोद जठार यांचा मात्र या वर्षी कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कासार्डे तिठा या त्यांच्या कार्यालयाजवळ 57 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून,, मोठ्या दिमाखात रात्री साडेदहा वाजता कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी दिवसभर कासार्डे तिठ्यावरील त्यांच्या कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती.
माजी आमदार प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्त” हास्य जत्रा “चे कलाकार :—गौरव मोरे ,वनिता खरात ,नमिता संभेराव ,प्रसाद खांडेकर ,जयंत मटकर ,गायिका सूनेहा ठाकूर व नाधवडे चे उदयोन्मुख गायक हर्ष नकाशे यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले .
तर रात्री दहा वाजता आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत केक कापून आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीत प्रमोद जठार यांच्या 57 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्त प्रमोद जठार मित्रमंडळा कडून कोकणचा राजा हापूस आंब्याची माळ व पुष्पमाला घालून प्रमोद जठार यांचे कार्यकर्त्या तर्फे अभीष्टचिंतन करण्यात आले.या सर्व शुभेच्छांचा स्विकार जठारांनी अगदी हसतमुखाने केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!