कबड्डी यंगस्टार चषकाचा मानकरी ठरला ढालकाठी कणकवली

कबड्डी यंगस्टार चषकाचा मानकरी ठरला ढालकाठी कणकवली

*कोकण Express*

*कबड्डी यंगस्टार चषकाचा मानकरी ठरला ढालकाठी कणकवली…!*

*उपविजेता वसंत चॅलेंजर, मणेरी – दोडामार्ग…!*

*तर तृतीय- विराज स्पोर्टस् कणकवली, चतुर्थ- जय मानशेश्वर, वेंगुर्लेने पटकावला…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली यंगस्टार मित्रमंडळ आयोजित प्रिमीअर लीग कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना ढालकाठी कणकवली विरुद्ध वसंत चॅलेंजर, मणेरी – दोडामार्ग यांच्यात रंगला.यंगस्टार चषक कोण पटकवणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून असतानाच या अटीतटीच्या लढतीत अखेरीस ढालकाठी,कणकवली या संघाने बाजी मारत यंगस्टार चषकावर नाव शिक्कामोर्तब केले. तर वसंत चॅलेंजर , मणेरी,दोडामार्ग संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.स्पर्धेतील तृतीय क्रमांक विराज स्पोर्टस् कणकवली तर चतुर्थ क्रमांक जय मानशेश्वर,वेंगुर्ले संघाने पटकाविला.

विद्यामंदिर हायस्कूलच्या पंटागणावर प.पू.भालचंद्र महाराज स्टेडियमवर तीन दिवस चाललेल्या या प्रकाशझोतातील कबड्डी स्पर्धेत शिस्तबद्ध संघ म्हणून अक्षय मित्रमंडळ कणकवली तर अष्टपैलू खेळाडू आणि बोनस किंग म्हणून अक्षय पाटील ( ढालकाठी कणकवली ) उकृष्ट चढाई धुलाजी खरात ( विराज स्पोर्टस् ) , उकृष्ट पकड सुमित गावडे ( वसंत चॅलेंजर , मणेरी – दोडामार्ग ) , उगवता तारा योगेश घाडी ( विराज स्पोर्टस् , कणकवली ) , अंतिम सामन्यातील सामनावीर अमित राणे ( ढालकाठी , कणकवली ) यांची निवड करण्यात आली.या खेळाडूंसह विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख रक्कमेसह मानचा चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी नगरसेविका प्रतीक्षा सावंत,केमीस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष दयानंद उबाळे,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे,उबाळे कॅटरर्सचे मालक भरत उबाळे , अरुण जोगळे,यंगस्टार मित्रमंडळाचे अध्यक्ष अण्णा कोदे,भैय्या आळवे,नंदू वाळके,रुपेशकेळुसकर,कबड्डीपटू रुपेश परब,तुषार साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते . रात्रौ उशीरापर्यंत चाललेल्या कबड्डी स्पर्धेला क्रीडारसिकांचा उत्स्फूत प्रतिसाद लाभला. उपांत्य फेरी ढालकाठी कणकवली व जय मानशेश्वर , वेंगुर्ले यांच्यात झाली.या चुरशीच्या झालेल्या सामन्यात ढालकाठी संघाने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या दरम्यान,रुपेश परब यांनी मालवणी बोली भाषेत कबड्डी स्पर्धेचे समालोचन करून क्रिडारसिकांना खिळवून ठेवले. तर तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या सामन्यांचे सुप्रसिद्ध समालोचन बाळू वालावलकर , बाबू बातकर यांनी केले.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भैय्या आळवे,नंदू आळवे, विकास वाळके,रुपेश केळुसकर,रुपेश वाळके,ललित राणे,सागर राणे , रवी सावंत,परेश परब,रुचिर ठाकूर,तुषार मोर्ये,नाना कोदे , परेश वाळके,प्रशांत साटविलकर, मंगेश म्हसकर,बंटी तहसीलदार अभी चव्हाण,प्रतिक कडुलकर,अमिता राणे,शिवलिंग पाटील,रुपेश परब,ओमकार हळदिवे,अमोल पेडणेकर, व्यंकटेश सावंत,संतोष सुतार, रघू सुतार,प्रियांका कोरगावकर,श्री. आर्डेकर यांनी विशेष मेहनत घेतली.

दरम्यान, तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत कणकवली शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी देऊन स्पर्धेच्या आयोजनाबद्दल कौतूक केले.तर शेवटच्या दिवशी माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री , पोलीस अधिकारी सचिन हुंदळेकर,जिल्हा बँकेचे संचालक अँड.समीर सावंत,वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत,समीर साई, उद्योजक दीपक बेलवलकर , विशाल कामत,डॉ.विनय शिरोडकर, डॉ.शिकलगार,सर्वेक्ष तेली,सुयोग टिकले,रुपेश खाडये आदींनी भेटी दिल्या. सूत्रसंचालन बाबू वातकर यांनी केले. तरबआभार अण्णा कोदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!