ग्रामीण रूग्णालय वैभववाडी येथे मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन

ग्रामीण रूग्णालय वैभववाडी येथे मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन

*कोकण Express*

*ग्रामीण रूग्णालय वैभववाडी येथे मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्यावतीने सोमवार दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी ग्रामीण रूग्णालय वैभववाडी येथे सकाळी १० वा.ते २ वा. यावेळेत मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मोफत आरोग्य तपासणी तसेच तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिरासचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे.
या आरोग्य शिबीरात बालरोग, हृदयरोग, अस्थिव्यंग, पोटाचे आजार, कान, नाक ,घसा ,डोळ्यांचे विकार ,दंतरोग, तपासणी तसेच सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचणी एच आय व्ही एड्स तपासणी, व समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, फोटो व मोबाईल घेऊन येणे आवश्यक आहे. या शिबिराचा लाभ तालुक्यातील गरजूं नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!