महिंद्र सावंत मित्र मंडळ, कणकवली हेल्पलाईन आणि अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने कणकवली येथे आरोग्य शिबीर संपन्न

महिंद्र सावंत मित्र मंडळ, कणकवली हेल्पलाईन आणि अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने कणकवली येथे आरोग्य शिबीर संपन्न

*कोकण Express*

*महिंद्र सावंत मित्र मंडळ, कणकवली हेल्पलाईन आणि अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने कणकवली येथे आरोग्य शिबीर संपन्न*

*कणकवली ः प्रतिनिधी*

दिनांक ०९/०४/२०२२ रोजी महिंद्र सावंत मित्र मंडळ, कणकवली हेल्पलाईन आणि अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, हॉटेल रॉयल इन हॉल, कणकवली येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर (कणकवली हेल्पलाईन चे अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते) श्री महिंद्र सावंत ( कणकवली हेल्पलाईन चे संस्थापक) यांच्या उपस्थितीत सावंतवाडी चे श्री राजेंद्र मसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉक्टर श्री राहुल चौगुले ( हृदयरोगतज्ज्ञ) यांना श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सन्मानित केले
श्री राजेंद्र मसुरकर यांना श्री महेंद्र सावंत यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सन्मानित केले
श्री ओंकार दळवी (मूत्रविकार तज्ञ) यांना श्री निलेश नारायण मालंडकर यांनी शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सन्मानित केले
तसेच श्री मदन गोरे (अथायु हॉस्पिटल व्यवस्थापन) श्री अक्षय सुतार, श्री दिनेश डावरे, श्री विजय हराळे,आणि नर्स नेहा, तेजश्री यांना पुष्पगुच्छ देवुन सन्मानित करण्यात आले
या प्रसंगी श्री महेश तेली, श्री तळगावकर, श्री सुनिल कोरगांवकर, श्री प्रदीप मांजरेकर, श्री दिलिप मालंडकर आदी उपस्थित होते
या शिबिरात बहुसंख्येने पेशंट उपस्थित होते . उपस्थितांनी अशा प्रकारे शिबीर आयोजित करण्यात आले म्हणून आभार व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!