श्री देव पाचोबा देवस्थान डामरे येथे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्री देव पाचोबा देवस्थान डामरे येथे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

*कोकण Express*

*श्री देव पाचोबा देवस्थान डामरे येथे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

श्री देव पाचोबा देवस्थान डामरे येथे प्रतिवर्षाप्रमाणे रविवारी दि 10 एप्रिल रोजी रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे तरी भाविकांनी यात सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन श्री देव पाचोबा मित्रमंडळ डामरे फोंडाघाट यांच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळी 10 ते 11 सत्यनारायणाची महापूजा, दुपारी12 ते 3 महाप्रसाद, 3 ते 6 हळदीकुंकू, सायं. 6 ते 7 होम मिनिस्टर स्पर्धा, सायंकाळी 7 ते 8 फनी गेम्स स्पर्धा, रात्री 08 वाजता पंचक्रोशी निमंत्रित भजन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून आयोजित कार्यक्रमात सहभाग घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!