शिरवल येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

शिरवल येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

*कोकण  Express*

*शिरवल येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल आणिव ओम गणेश मित्र मंडळ शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त श्री.देव रवळनाथ मंदिरा शेजारी भलाजी सखाराम गुरव रंगमंच येथे मंगळवारी ८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत नेत्रतपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप सकाळी १० ते सायंकाळी ५ वा.ई श्रमकार्ड नोंदणी ( मोफत) – त्यासाठी आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड ,बॅंक खाते क्रमांक, ओटीपी साठी मोबाईल नंबर, सायंकाळी ६ ते ६:३० मान्यवरांचे स्वागत, व दीपप्रज्वलन,सायंकाळी ६:३० ते १० वा.पर्यंत खेळ पैठणीचा – व रेकॉर्ड डान्स स्पर्धा,रात्री १० नंतर स्नेहभोजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गावातील महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.असे आवाहन ओम गणेश मित्रमंडळ शिरवलच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सूचित गुरव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!