महिलाच करू शकतात आपल्या मुलांचं व्यसनांपासून रक्षण

महिलाच करू शकतात आपल्या मुलांचं व्यसनांपासून रक्षण

*कोकण  Express*

*महिलाच करू शकतात आपल्या मुलांचं व्यसनांपासून रक्षण…*

*अर्पिता मुंबरकर ; गोपुरी आश्रम येथे महिला व पालक मेळावा…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महिलांमध्ये त्यांच्या अधिकाराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी महिला दिन साजरा करण्याची गरज आहे तसेच महिलांवर होणारे अन्याय अत्याचार याला कारणीभूत असलेल्या व्यसनांना विरोध करण्यासाठी महिलांनी एकत्रित आवाज उठवला पाहिजे, आणि आपली मुले उद्याचे सुज्ञनागरिक घडविण्यासाठी आपण महिलांनीच मुलांना निर्व्यसनी ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन व्यसनांपासून त्यांचे रक्षण केले पाहिजे. असे प्रतिपादन आश्रमाच्या संचालिका, नशाबंदी मंडळाच्या संघटक अर्पिता मुंबरकर यांनी केले.

महिला दिनानिमित्ताने जि. प. शाळा क्र.५. कणकवलीच्या वतीने गोपुरी आश्रम येथे आयोजित केलेल्या महिला व पालक मेळाव्यात संवाद साधताना अर्पिता मुंबरकर यांनी आपले विचार मांडले.

जि प शाळा क्रमांक पाच कणकवलीच्या मुख्याध्यापक कल्पना मलये तसेच शिक्षक हर्षकला लोके यांनी शाळेच्या वतीने गोपुरी आश्रमात निसर्गाच्या सानिध्यात महिला दिन साजरा करण्याच्या हेतूने महिला व पालक विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी मुख्याध्यापक कल्पना मलये यांनीदेखील मुलांमध्ये मोबाईलच्या वाढत्या व्यसनांबद्दल पालकांशी संवाद साधला. मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ उज्वला जावडेकर, सदस्य आशा भातकांडे, केतकी दळवी, सानिका यादव, गुरुदास पाताडे, चंद्रभागा सावंत, यांनी सहकार्य केले तसेच विद्यार्थी प्रतिनिधी मनीष मेस्त्री आणि दिया राणे यांनी आभार व्यक्त केले शेवटी व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊन मेळाव्याची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!