*कोकण Express*
*सिंधुदुर्गात आज आणखी २२ जण कोरोना पॉझिटिव्ह…*
*डॉ.श्रीमंत चव्हाण; सावंतवाडी तालुक्यात एकाचा मृत्यू…*
*सिंधुदुर्गनगरी ता.२४:*
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ८५० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात १९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आज आणखी २२ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर सावंतवाडी तालुक्यात ६६ वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला आहे. त्याला मधुमेहाचा आजार होता. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.