*कोकण Express*
*फोंडाघाट मध्ये भाजपला खिंडार…*
*जि. प. संजय आग्रे यांची यशस्वी रणनिती….*
*विकास सोसायटीचे माजी चेअरमन राजन नानचे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*
*पं.स. सदस्य मनोज रावराणे यांच्यासह तालुकाध्यक्ष राजन चिके यांना मोठा धक्का…*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
भाजपा युवा तालुका कार्यकारणी ची काही दिवसांपूर्वीच कार्यकारणी जाहीर झाली होती. यामध्ये सरचिटणीस पदी फोंडाघाट येथील कट्टर राणे राणे समर्थक आणि पं.स. सदस्य मनोज रावराणे यांचे खंदे समर्थक पवण भोगले यांची वर्णी लागली होती. मात्र महिना पूर्ण होण्याआधीच पवन यांनी भाजप पक्षाच्या पदासह पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्याच प्रमाणे भाजप पक्षात घुसमट होत असलेले आणि राजन चिके यांचे निकटवर्तीय तथा विकास सोसायटीचे माजी चेअरमन राजन नानचे यांनी जि.प. सदस्य संजय आग्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष संजय पडते, जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर,सतीश सावंत तालुकाध्यक्ष शैलेश भोगले,आबू पटेल, संदेश पटेल, सेनायुवा जिल्हाध्यक्ष हर्षद गावडे, फोंडाघाट मधील शिवसैनिक यांच्या उपस्थितीत भगवा हाती घेतला.
हा प्रवेश फोंडाघाट येथे झाला असून यापुढे आजूनही तालुक्यातील काही नाराज कार्यकर्ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा जि.प. सदस्य संजय आग्रे यांनी केला.तर पक्ष प्रवेश झाल्यामुळे यापुढे सेना स्टाईलनेच सर्वसामान्य जनतेसाठी प्रयत्न करणार असल्याचे पवन भोगले आणि राजन नानचे यांनी सांगितले.