तळेरेतील रिक्षा संघटनेच्यावतीने उद्या मंगळवारी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

तळेरेतील रिक्षा संघटनेच्यावतीने उद्या मंगळवारी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

*कोकण Express*

*तळेरेतील रिक्षा संघटनेच्यावतीने उद्या मंगळवारी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन*

*कासार्डे  ः संजय भोसले* 

सालाबादप्रमाणे याही वर्षी रिक्षा संघटना तळेरेच्यावतीने आज मंगळवार दि.८फेब्रुवारी रोजी सत्यनारायण महापूजा निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स.८ वा.श्री सत्यनारायण महापूजा, स.९ वा.ढोलवादन,स.१० वा. तीर्थप्रसाद,स.११वा. स्थानिक भजन-(गांगेश्वर भजन मंडळ तळेरे बुवा. संतोष तळेकर यांचे  सुस्वर भजन),दु.१वा.पंचक्रोशीतील इ. १०वी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या वि र्थ्यांचा सत्कार (गुणगौरव) समारंभ,दु.२वा.खास आकर्षण -जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा, दु.३ ते सायं ५ वा. महिलांसाठीहळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व भाविकांनी, ग्रामस्थांनी व हितचिंतकांनी सर्व कार्यक्रम उपस्थित रहावे असे रिक्षा संघटना तळेरेचे अध्यक्ष राजकुमार तळेकर,व खजिनदार संजय पेंढारकर व सर्व सभासदांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!