*वेताळबांबर्डे जि. प. मतदारसंघात शिवसेनेची हिर्लोक येथे बैठक; संघटन बळकटीकरणाचा दादा साईल यांचा निर्धार*

*वेताळबांबर्डे जि. प. मतदारसंघात शिवसेनेची हिर्लोक येथे बैठक; संघटन बळकटीकरणाचा दादा साईल यांचा निर्धार*

*कोंकण एक्सप्रेस*

*वेताळबांबर्डे जि. प. मतदारसंघात शिवसेनेची हिर्लोक येथे बैठक; संघटन बळकटीकरणाचा दादा साईल यांचा निर्धार*

*​हिर्लोक (प्रतिनिधी) :*

कुडाळ तालुका संपर्क दौऱ्याअंतर्गत वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघाची महत्त्वपूर्ण सभा हिर्लोक येथे अत्यंत उत्साहात पार पडली. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, स्थानिक विकासप्रश्न आणि पक्षाची भूमिका यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
​या सभेला उपस्थित राहून शिवसेनेचे जिल्हा सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.
​उपस्थितांशी मार्गदर्शन करताना दादा साईल म्हणाले, “ग्रामीण भागातील प्रश्न सोडवणे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवणे ही आपली प्राथमिकता आहे. आगामी काळात सर्व कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन काम करावे आणि संघटन तळागाळापर्यंत अधिक मजबूत करावे.”
​या सभेस महिला जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सौ. दीपलक्ष्मी पडते, तालुकाप्रमुख श्री. दीपक नारकर, श्री. विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य श्री. रूपेश कानडे, श्री. नागेश आईर यांच्यासह परिसरातील सर्व सरपंच, शाखाप्रमुख, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या बैठकीत उपस्थितांनी पक्षाचे काम अधिक गतीने पुढे नेण्याचा आणि संघटन अधिक बळकट करण्याचा एकमुखाने निर्धार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!