*कोंकण एक्सप्रेस*
*जांभवडे येथे आंब्रड जि. प. मतदारसंघाची बैठक; शिवसेनेचे संघटन मजबूत करण्याचा दादा साईल यांचा निर्धार*
*जांभवडे (प्रतिनिधी) :*
कुडाळ तालुका संपर्क दौऱ्याअंतर्गत आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघाची महत्त्वपूर्ण सभा जांभवडे येथे पंचायत समिती सदस्य श्री. बाळू मडव यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साहात पार पडली. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, पक्षाची भूमिका आणि स्थानिक प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सभेस उपस्थित राहून शिवसेनेचे जिल्हा सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दादा साईल म्हणाले, “ग्रामीण भागात पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवून संघटन अधिक बळकट करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. सर्वांच्या एकत्रित सहकार्याने आणि मेहनतीने आगामी काळात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करू.”
या सभेस महिला जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सौ. दीपलक्ष्मी पडते, तालुकाप्रमुख श्री. दीपक नारकर, श्री. विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य श्री. रूपेश कानडे, पंचायत समिती सदस्य श्री. बाळू मडव, विभागप्रमुख श्री. विठ्ठल तेली, उपविभागप्रमुख श्री. सचिन तेली यांच्यासह आंब्रड विभागातील सर्व सरपंच, शाखाप्रमुख, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत उपस्थितांनी पक्षाचे कार्य अधिक गतीने पुढे नेण्याचा आणि संघटन अधिक मजबूत करण्याचा एकमुखाने निर्धार व्यक्त केला.

