*कोकण Express*
*भिरवंडे रामेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू..!*
*१४ फेब्रुवारी पर्यंत हरिनाम सप्ताहा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम…!*
*हरिनाम सप्ताहसाठी देशभरातून भाविक गावांमध्ये दाखल…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील भिरवंडे येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे. आज दुपारी मंदिरांमध्ये घटस्थापना होऊन वार्षिक हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे. येत्या १४ फेब्रुवारी पर्यंत हा वार्षिक उत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी गावामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
रामेश्वर मंदिराची रंगरंगोटी सजावट करण्यात आली असून विद्युत रोषणाईने मंदिर सजले आहे. आज दुपारी दोन वाजता भिरवंडे गावातील ग्रामस्थ आणि पाहुणेमंडळी यांच्या उपस्थितीत श्रीदेव रामेश्वराचे घटस्थापना झाली आहे. आजपासून १४ फेब्रुवारी पर्यंत हरिनाम सप्ताह होणार आहे. या हरिनाम सप्ताह निमित्त उद्यापासून दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद आणि रात्री बारा वाजता ढोल-ताशांच्या गजरामध्ये श्रीदेव रामेश्वराची पालखी प्रदक्षणा होणार आहे. हरिनाम सप्ताहसाठी देशभरातून भाविक गावांमध्ये दाखल होत आहेत. मंदिराच्या परिसरामध्ये वेगळ्या प्रकारची खाऊची दुकाने, हॉटेल्स उभी करण्यात आली आहेत. जागोजागी रंगरंगोटी करण्यात आली आहे. हरिनाम सप्ताह निमित्त भजनांचे मेळे मंदिरांमध्ये दाखल होत आहेत. भाविकांसाठी लाडूचा प्रसाद आहे. शेकडो भाविक रामेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत. भाविकांच्या नवसाला पावना रामेश्वर अशी देवाची ख्याती आहे. त्यामुळे गावातील शेकडो चाकरमानी देशाच्या वेगवेगळ्या भागातून भिरवंडे गावत दाखल होत आहेत. यंदा करणाचे नियम पाळून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

