गीतगायनातून देशप्रेमाचा जागर

गीतगायनातून देशप्रेमाचा जागर

*कोकण Express*

*गीतगायनातून देशप्रेमाचा जागर*

*नेहरु युवा केंद्र मार्फत देशभक्तीपर गीतगायन आणि वेशभूषा स्पर्धा संपन्न*

*कासार्डे  ः संजय भोसले *

तळेरे येथील ‘प्रज्ञांगण’ संस्थेच्या सभागृहात नेहरू युवा केंद्र तर्फे आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन आणि वेशभूषा स्पर्धा संपन्न झाल्या. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पडेल येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थीगटाने पटकावला. द्वितीय क्रमांक सोमलेवाडी ग्रुप यांना मिळाला तर तृतीय क्रमांक संकेत जाधव आणि संकल्प चौकेकर यांना विभागून मिळाला. उत्तेजनार्थ बक्षिस समीर तांबे आणि ग्रुप यांना देण्यात आले.
वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक नीरज रमेश पवार याने पटकावला. व्दितीय क्रमांक परेश विलास कांडर याने तर तृतीय क्रमांक समीक्षा विलास मांजरेकर आणि नमिता संतोष घाडीगावकर यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिक अर्चना हिवाळकर हिला मिळाले. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. गीतगायन स्पर्धेचे परीक्षण सौ. विश्रांती कोयंडे यांनी तर वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण सौ. श्रावणी मदभावे यांनी केले.

यावेळी नेहरू युवा केंद्राच्या कणकवली तालुका समन्वयक वर्षा केसरकर, अक्षय मोडक, देवगड तालुका समन्वयक सुजय जाधव आणि रीना दुदवडकर, प्रथमेश पौळ उपस्थित होते. तसेच तळेरेचे माजी उपसरपंच दीपक नांदलस्कर, विद्यमान उपसरपंच दिनेश मुद्रस, स्व. सुनील तळेकर वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, राजू वळंजू, नीलेश तळेकर, पत्रकार गुरुप्रसाद सावंत, संजय खानविलकर, दत्तात्रय मारकड, अंकित घाडी, ओम वाड्ये, रश्मी साटम, संचिता पावसकर, शबरी पावसकर, प्रज्ञांगण परिवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा केसरकर, प्रास्ताविक सुजय जाधव यांनी केले तर रीना दुदवडकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!