*कोकण Express*
*वैभववाडी : न.पं.च्या चार जागांसाठी उद्या मतदान : यंत्रणा सज्ज*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वाभवे – वैभववाडी नगरपंचायतच्या चार जागांची निवडणूक मंगळवार दि. 18 जानेवारी रोजी होत आहे. या निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. 4 मतदान केंद्रावर 36 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त मतदान केंद्र व शहरात तैनात करण्यात आला आहे.
नगरपंचायतीच्या वतीने प्रभाग क्र.3, 5, 15 आणि 16 या चार प्रभागासाठी मंगळवारी मतदान होत आहे. यासाठी 3 व 5 प्रभागाचे मतदान अ. रा. विदयालयात, प्रभाग 15 चे मतदान अंगणवाडी केंद्र वाभवे गावठण तर 16 चे मतदान विदया मंदिर शाळा वाभवे येथील केंद्रावर होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी, एक पोलिस, एक शिपाई असे सहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर 12 राखीव अधिकारी कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस अधिकारी, 37 अंमलदार व 29 होमगार्ड असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशी माहीती वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली आहे.

