*कोकण Express*
*शिवसेना उपतालुकप्रमुख शरद वायंगणकर यांची पदावरुन हकालपट्टी*
*उपतालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांची निवड*
*जिल्हाप्रमुख संजय पडते यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उपतालुकाप्रमुख शरद वायंगणकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर त्या जागी नव्याने उपतालुकाप्रमुखपदी गोट्या कोळसुलकर यांची नियुक्ती करत असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे नूतन उपतालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांचे नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,बँक संचालक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत,उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, नगरसेवक कन्हैया पारकर,बाळू पारकर, अमित मयेकर, शहराध्यक्ष शेखर राणे,रुपेश आमडोसकर,राजू राठोड, हर्षद गावडे,मंगेश सावंत,दामू सावंत,महेंद्र डीचवलकर,तेजस राणे, रिमेश चव्हाण आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

