कणकवली शाळा क्रमांक 3 चे एक शिक्षक कोरोना बाधित

कणकवली शाळा क्रमांक 3 चे एक शिक्षक कोरोना बाधित

*कोकण  Express*

*कणकवली शाळा क्रमांक 3 चे एक शिक्षक कोरोना बाधित…*

*शाळा 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय*

*कणकवली ः प्रतिनिधी*कणकवली शहरातील शाळा क्रमांक 3 चे एक शिक्षक कोरोना बाधित मिळाल्याने सोमवार पासून हि शाळा सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय शाळेने घेतला आहे. तसेच या शिक्षकांच्या संपर्कात असणाऱ्या अन्य शिक्षकांचे ही स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. या शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह मिळाल्याने संबंधित शाळेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाच्या पुढील काळात शाळा सुरू ठेवण्यासाठी शिक्षकांनी व पालक समितीने पुढे येऊन खबरदारी घेतल्यास शाळा सुरु राहू शकतात व मागील दोन वर्ष मुलांचे जे नुकसान झाले ते नुकसान न होण्यासाठी प्रयत्न करू शकतात. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!