*कोकण Express*
*बावशीत रास्त धान्य दुकान सुरु करणार असेेेेे आश्वासन देऊनही पुरवठा शाखा अधिकारी यांनी घेतली माघार*
*जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाला बसलेल्या महिलांची आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी येथील रास्त धान्य दुकान चालविण्यास देण्यात आलेल्या आश्वासनाची पूरवठा शाखा अधिकारी यांनी पूर्तता करण्यास माघार घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाला बसलेल्या महिलांची माननीय आमदार नितेश राणे साहेब यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री,श्री. अण्णा कोदे,श्री. गणेश तळगावकर,पप्पू पुजारी,लक्ष्मण घाडीगांवकर आदी मान्यवर होते उपस्थित.

