*कोकण Express*
*नितेश राणे – गोट्या सावंत कणकवली पोलीस ठाण्यात*
*पोलिसांना लागेल ते सहकार्य आपण करणार असल्याचे यावेळी आमदार नितेश राणे सांगितले*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली पोलिसांनी संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना नोटीस बजावली होती. त्याचे उत्तर आमदार राणे यांच्या वकिलांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर आज आमदार नितेश राणे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी कणकवली पोलिसात हजेरी लावली.
आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की माझी चौकशी काल झाली होती. गोट्या सावंत यांची चौकशी बाकी होती. आम्ही आमच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहोत. पोलिसांना लागेल ते सहकार्य आपण करणार असल्याचे यावेळी आमदार नितेश राणे यांनी बोलताना सांगितले. यावेळी गोट्या सावंत उपस्थित होते.

