*कोकण Express*
*कणकवली स्थानकातून आज फोंडाघाटला बस रवाना…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली-सावंतवाडी मार्गावर एस.टी. फेरी सुरू केल्यानंतर आज कणकवली आगारातून कणकवली ते फोंडाघाट अशी बस अाज रवाना करण्यात आली. जसजसे एस.टी. चे चालक-वाहक रूजू होतील तसतशी अन्य मार्गावरही एस.टी. फेऱ्या सुरू होणार असल्याची माहिती एस.टी. प्रशासनाकडून देण्यात आली.
गेले २९ दिवस सिंधुदुर्गातील एस.टी. कामगारांचा संप सुरू असून अजून कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एस.टी. सेवा सुरू करण्याचा प्रयत्न महामंडळाने केला आहे.
यात काल (ता.६) कणकवली-सावंतवाडी-कणकवली अशी एस.टी. फेरी सोडण्यात आली. यात एकूण २४ प्रवाशांनी प्रवास केला होता. तर आज दुपारी बारा वाजता कणकवली-फोंडाघाट मार्गावर एस.टी.फेरी सोडण्यात आली. एस.टी.च्या सिंधुदुर्ग विभागात २१४६ कर्मचारी आहेत. यातील १४५४ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. यातील बहुतांश कर्मचारी हे चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी असल्याने सिंधुदुर्ग एस.टी. विभागाला अजूनही सर्व आगारातून बसेस सुरू करता आलेल्या नाहीत.

