वेंगुर्ला येथे निर्मित केलेला लघुपट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात प्रदर्शित करणार

वेंगुर्ला येथे निर्मित केलेला लघुपट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात प्रदर्शित करणार

*कोकण Express*

*वेंगुर्ला येथे निर्मित केलेला लघुपट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात प्रदर्शित करणार…*

*आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक अशोक राणे यांचे प्रतिपादन*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

वेंगुर्ल्यात निर्मिती केलेला लघुपट आंतरराष्ट्रीय लघुपट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करू. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समीक्षक लेखक-दिग्दर्शक सिनेमा अशोक राणे आणि लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व पटकथाकार मनोज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली येथील बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाच्या सभागृहात लघुपट लघुपट निर्मिती आणि मार्केटिंग व्यवस्थापन ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये जवळपास 50 स्त्री-पुरुषांचा सहभाग होता. चित्रपट निर्मिती पासून चित्रपट कसा पहावा. यासंदर्भात चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, सिनेमा ग्राफिक, एडिटिंग आणि चित्रपटाचे मार्केटिंग आदी चित्रपटांच्या विविध अंगा बाबत अतिशय बारकावे सांगत मार्गदर्शन करण्यात आले त्यासाठी 3 ते 4 शॉर्ट फिल्म दाखविण्यात आल्या. आणि त्यातील विविध अंगांचा बारकाईने निरीक्षण करून त्याबाबत सखोल माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे शॉर्ट फिल्म चे मार्केटिंग कसे करावे. व त्या माध्यमातून उत्पन्न कसे मिळवावे. याबाबत ही मनोज कदम यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण दिवसभर चाललेल्या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील लाभार्थी सुद्धा सहभागी झाले होते. वेंगुर्ले तालुक्यातील पाल गावचे सुपुत्र आणि मुंबईच्या प्रबोधन गोरेगाव संस्थेचे पदाधिकारी गोविंद उर्फ विजू गावडे यांच्या संकल्पनेतून आणि वेंगुर्ल्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘माझा वेंगुर्ला’ या यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यशाळेचा समारोप करताना या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची व्यक्तींनी लघुपटाची निर्मिती करावी. या लघुपट सर्व प्रकारचे आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करून तो लघुपट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये पाठविला जाईल. असे आव्हान अशोक राणे आणि विजू गावडे यांनी केले. उत्तरोत्तर रंगत रंगतदार झालेल्या या कार्यशाळेचे नियोजन माझा वेंगुर्ला या संस्थेच्या सर्व सदस्यांनी अतिशय सुंदर आणि शिस्तबद्धरीतीने पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!