कोविडच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या गोवा राज्यातील खाजगी बसेसना दोडामार्ग हद्दीत प्रवेश

कोविडच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या गोवा राज्यातील खाजगी बसेसना दोडामार्ग हद्दीत प्रवेश

*कोकण Express*

*कोविडच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या गोवा राज्यातील खाजगी बसेसना दोडामार्ग हद्दीत प्रवेश*

*शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या इशाऱ्याने प्रशासनाला जाग*

*दोडामार्ग ःःप्रतिनिधी* 

कोविडच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या गोवा राज्यात ये-जा करणाऱ्या खाजगी बसेसना दोडामार्ग हद्दीत प्रवेश देण्यासाठी आजची डेडलाईन शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिली होती.याची दखल अखेर प्रशासनाने घेत बसेसना दोडामार्गात प्रवेश दिला.दोडामार्ग पोलीस निरीक्षक आर.जि.नदाफ यांनी श्रीफळ वाढवून या बसेसना दोडामार्ग हद्दीत प्रवेश दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात ये-जा करणाऱ्या बसेसना गोवा-दोडामार्ग सीमेवरच रोखण्यात येत होते.त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत होता.
दरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज सकाळी ११ पर्यंतची डेडलाईन प्रशासनाला दिली होती.अन्यथा स्वतः रस्त्यावर उतरून गेट हटवण्याचा इशारा दिला होता.अखेर प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत या बसेसना दोडामार्गात येण्याचा मार्ग मोकळा केला.

यावेळी तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!