कोविड लसीकरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल आल्याने मनसेने केले जिल्हा आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन

कोविड लसीकरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल आल्याने मनसेने केले जिल्हा आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन

*कोकण  Express*

*कोविड लसीकरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल आल्याने मनसेने केले जिल्हा आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कोरोना आपत्काल परिस्थिती व त्यानंतरच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना या दरम्यान शासनाकडून चालू करण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान प्राप्त केल्याने मनसेने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रजित नायर यांची भेट घेत पुष्पगुच्छ व अभिनंदन पत्र देऊन अभिनंदन केले आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री खलीपे देखील उपस्थित होते.कोविड परिस्थितीत सुनियोजित पद्धतीने सर्व यंत्रणा हाताळून जास्तीत जास्त प्रमाणात सामान्य जनतेपर्यंत लसीकरणाचा लाभ पोहचण्यासाठी विशेष कटाक्षपूर्वक लक्ष दिले व जिल्ह्यात गावागावात वाडीवस्त्यांवर लसीकरण केंद्रे आयोजित केल्यामुळेच लसीकरण मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्हा अग्रक्रमांकावर आला आहे अशी भावना मनसेने व्यक्त करत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,विभाग अध्यक्ष रामा सावंत व अमोल जंगले आदी पदाधिकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!