भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य अरविद भोगले यांचा कॉग्रेस प्रवेश

भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य अरविद भोगले यांचा कॉग्रेस प्रवेश

 *कोकण  Express*

*भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य अरविद भोगले यांचा कॉग्रेस प्रवेश*

*देवगड ः अनिकेत तर्फे*

देवगड तालुक्यातील किंजवडे येथील भाजपचे माजी
देवगड पंचायत समिती सदस्य अरविद बाळकृष्ण भोगले यांनी नुकताच राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे,
कॉग्रेस सिंधुदुर्ग संपर्क मंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते
अरविद बाळकृष्ण भोगले हे भारतीय जनता पक्षातुन
२००२ रोजी किंजवडे येथुन पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते,
२००२ ते २००७ या कालावधीत देवगड पंचायत समिती सदस्य तर किजवडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून १९९२ ते २००२ (१० वर्षे) तर किंजवडे विकास सहकारी संस्था व्हाईस चेरमन तीन वर्षे आदी पदावर त्यांनी कार्य केले आहे,
काही दिवसांपूर्वी भोगले यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे,कॉग्रेस संघटना वाढविण्यासाठी आपले प्रयत्न रहातील तसेच काही भाजप कार्यकर्ते लवकरच कॉग्रेस पक्षात येतील असे अरविद भोगले यांनी सांगितले आहे,
किजवडे गावातील देवगड भाजप तालुकाध्यक्ष संतोष किजवडे यांना युवक कॉग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी राजकीय धक्का दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे,
यावेळी कॉग्रेस सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील सिंधुदुर्ग कॉग्रेस अध्यक्ष बाळा गावडे,उपाध्यक्ष इर्षाद शेख,साईनाथ चव्हाण,विकासभाई सावंत,विभावरी सुके,युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग प्रभारी शंभूराजे,कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर,देवगड तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर,युवक काँग्रेस अध्यक्ष सूरज घाडी,किजवडे उपसरपंच दत्ताराम कदम,ग्रामपंचायत सदस्य गिरीश चव्हाण,,संदीप किजवडेकर,अशोक घाडी,इन एस यु आय गणेश कांबळी,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!