कोल्हापूरच्या अमृता कारंडे या विध्यार्थीनिला तब्बल, ४१ लाख रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. ते ही एका अमेरिकन कंपनीतुन, ती सध्या २१ वर्षाची असुन कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी KIT मध्ये सॉफ्टेवेअर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे.अमृताला ‘अॅडॉब’ या कंपनीने प्री प्लेसमेंट ऑफर दिली आहे. त्याचे लेटरही या कंनीने दिले आहे. नोएडा येथील कार्यालयामध्ये ती लवकरच अपॉईंट होणार आहे. या कंपनीने आयोजित केलेल्या सी कोडींगच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर तीला ही ऑफर मिळाल्याचे केआयटीचे अध्यत्र सुनिल कुलकर्णी यांनी सांगीतले आहे.
तिचे वडील विजयकुमार रिक्षाचालक असुन आई गृहिणी आहे. माझ्या आईवडीलांनी खुप कष्ट घेतले आहे. तरी भारतामधील माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये संशोधन करण्याची इच्छा असल्याचे अमृताने म्हंटले आहे.
