*कोकण Express*
*आता गरोदर महिलांना कोरोना लसीचा डोस देणार…*
*संजना सावंत; प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला राबवली जाणार मोहीम…*
*सिंधुदुर्गनगरी ता.३१:*
१८ वर्षांवरील नागरिकांपाठोपाठ आता गरोदर महिलांनाही आता “कोव्हक्सीन” ही कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक महिन्याचा ९ तरिखला ही लसीकरण मोहीम राबविण्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आज दिली.
कोरोना महामारीवर उपाय ठरलेली कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास देशात सुरू झाल्यानंतर ही लस वयोगट नुसार देण्यात येत आहे. त्यात ही लस गरोदर मातांना देण्यात यावी का याबाबत संशोधन सुरू होते. या संशोधनाला अखेर यश आले असून ही लस गरोदर मातांना दिल्यास त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचे व सुरक्षित असल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे. त्यामुळे गरोदर मातांना आता कोवॅक्सिन लस देण्यात येणार आहे. तशा शासनाच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या आहेत. गरोदर मातांना ही लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. गरोदर माता या महिन्याच्या ९ तारीख ला प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी साठी येत असतात त्यामुळे लसीकरण साठी त्यांना पुन्हा येणे लागू नये यासाठी महिन्याच्या ९ तारीखलाच हे विशेष लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी लस राखीव ठेवली जाणार आहे. तसे नियोजन आरोग्य विभागामार्फत सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ संदेश कांबळे आदी उपस्थित होते.