*कोकण Express*
*ॲड. परिमल नाईक यांची लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी निवड*
*पदग्रहण समारंभात घेतली शपथ*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी नगरसेवक तथा जेष्ठ नोटरी ॲड. परिमल नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली. पदग्रहण व शपथ विधी कार्यक्रमात मालवणचे ला.गणेश प्रभुलकर यांनी त्याना शपथ दिली या प्रसंगी ज्येष्ठ लायन केशव फाटक हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
या समारंभास नवीन कार्यकरणी पदाधिकारी सचिव ला.अमेय पई, उपाध्यक्ष ला. विद्याधर तावडे, उपाध्यक्ष ला. दत्तू नार्वेकर, खजिनदार ला. प्रसाद राऊत, गजानन नाईक, बोर्डेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित सर्व महनीय ला. सदस्यांनी नूतन अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुढील कार्यकाळात सर्व सदस्यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध समाजभिमुख उपक्रम राबविण्यात येतील. लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या वुई सर्व्ह या ब्रीदवाक्या नुसार सावंतवाडी लायन्स क्लब तर्फे विविध सेवाभावी उपक्रम राबवण्यात येतील. विशेषतः पर्यावरण, कुपोषण निर्मूलन, ज्येष्ठ नागरिक कल्याण यांनाही प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही सावंतवाडी लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष ॲड.परीमल नाईक यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव व सुरक्षितता या पाश्वभूमीवर सदर सभा व्हर्चुअल झूम ऍप द्वारे सुद्धा आयोजित करण्यात आली होती व त्या सभेस मालवण, कुडाळ, व रत्नागिरी येथील लायन क्लब सदस्य उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ ला. गजानन नाईक यांनी केले.