वेंगुर्ल्यातही शिवसेना आक्रमक, राणें यांच्या विरोधात घोषणाबाजी

वेंगुर्ल्यातही शिवसेना आक्रमक, राणें यांच्या विरोधात घोषणाबाजी

*कोकण Express*

*वेंगुर्ल्यातही शिवसेना आक्रमक, राणें यांच्या विरोधात घोषणाबाजी …*

*तात्काळ गुन्हा दाखल करा; वेंगुर्ला शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी…*

*वेंगुर्ले ःःप्रतिनिधी* 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्यावरून नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन आज वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार प्रवीण लोकरे यांना देण्यात आले.
वेंगुर्ले तालुक्यात शिवसेनेतर्फे सर्वत्र जोरदार निदर्शने व नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर भाजप कार्यालयासमोरून फेरी काढत नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पुतळा जाण्याचाही प्रयत्न केला गेला. परंतु तो पुतळा हिसकावून घेत पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यात पोलिस व शिवसैनिक यांच्यात झटापट ही झाली.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की २३ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल वक्तव्य करून भारतीय घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला भारतीय घटनेचा व महाराष्ट्र राज्य संस्कृतीचा अवमान केला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक म्हणून त्यांना घटनेने सर्वोच्च स्थान दिलेले आहे. आणि त्या अनुषंगाने ते राज्याचा कारभार करीत असतात परंतु नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य हे संपूर्ण राज्याच्या सर्व नागरिकांचा अपमान होणारे व घटनेची पायमल्ली होणारे असे आहे. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत व भारतीय दंड विधायक अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावा व त्यांना तातडीने अटक करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पालन करण्यात यावे अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. व जनआशीर्वाद यात्रा रोखण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, बाळा दळवी, सचिन देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, युवा सेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, प्रकाश गडेकर, विवेक आरोलकर, दादा सारंग, अण्णा वराडकर, वेदांग पेडणेकर, तेजस भगत, संदीप केळजी, आनंद बटा, गौतम मुळे, दिलीप राणे,डेलीन डिसोजा, राहुल नरसाळे आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!