*कोकण Express*
*महागाईला आळा घालण्यासाठी झोपलेल्या सरकारचे डोळे मनसे उघडणार*
*जिल्हाधिकारी कार्यालयावर 23 रोजी मोर्चाचे काढणार:दया मेस्त्री*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोना काळात, पुरसदृश्य परिस्थितीत जनतेच्या सुखदुःखात सामील होत. जनतेची सेवा करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेसोबत असुन महागाईला आळा घालण्यासाठी या झोपलेल्या सरकारचे डोळे उघडणार आहे.यासाठी 23 ऑगस्ट 21 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता माजी आम. परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे.अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अनागोंधी कारभारामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चालु असलेल्या अनधिकृतरित्या खनिज उत्खनन याला पाठीशी घालणाऱ्या या अधिकाऱ्यांविरोधात अप्पर जिल्हाधिकारी हटाव पर्यावरण बचाव आंदोलन आंदोलन छेडणार असल्याची माहिती मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिली कोरोना लॉकडाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय, लहानमोठ्या उद्योग धंदयावरपरिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. घर, उद्योग धंद्यासाठी काढलेले कर्ज,या कर्जाचा हप्ता थकीत असल्याने बँकांचा हप्ते वसुलीचा तगादा.., त्यात कोरोनाच्या भीतीने जनता या साऱ्या विवंचनेतून कसरत करीत मार्ग काढीत असताना डोक्यावर दिवसांगणिक वाढणाऱ्या महागाईचा भस्मासूर सर्वसामान्य जनतेला खाऊ की गिळू करतोय. सरकार सर्वसामान्य जनतेच्या वास्तव जीवनमानाचा अजिबात विचार न करता ससेहोलपट होणाऱ्या जनतेची ढिम्मपणे एकप्रकारे मजाच बघत आहे. इकोसेन्सेटिव्ह, वनसंज्ञा जमिनीचा देखील विचार न करता उत्खनन व होणारी बेसुमार वृक्षतोड, आर्थिक देवाणघेवाणीतून हम करे सो कायदा करीत जिल्ह्यात विध्वंस या अधिकाऱ्यांमार्फत चालु आहे. कळणे गावातील शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान. सुदैवाने जिवितहानी झाली नाही.पर्यटन जिल्हा असलेल्या या पर्यटनदृष्ट्या विकसनशील जिल्ह्यात नयनरम्य डोंगर दऱ्या, आंबोली सारखे हिलस्टेशनं, रेडी, वेंगुर्ले, मालवण,आचरा,देवगड विजयदुर्ग समुद्र किनारा, वैभववाडीतील बारमाही वाहणारा नापणे धबधबा,जिल्ह्यातील इतरत्र असणारे पावसाळी धबधबे, पुरातन देवळे मंदिरे, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास व ऐतिहासिक वारसा सांगणारे गडकिल्ले. जगप्रसिद्ध देवगड हापूस आंबा,फणसं, करवंदे,इतर कोकणी मेवा, आंबोलीसह, दोडामार्ग व जिल्ह्यात इतरत्र असणारी जैववैविधता या साऱ्याला ग्रहण लावणारा हा अधिकारी जिल्ह्याचा विकास नव्हे तर ऱ्हास करणार आहे. यांची उचलबांगडी मनसे करणार असून मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चात जिल्हावासियांनी सहभागी व्हावे ,झोपलेल्या सरकारला जाग करावे असे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी केले आहे.
