*कोकण Express*
*कळणे मायनिंग नुकसानग्रस्तांना कंपन्यांनी जास्तीत-जास्त नुकसान भरपाई द्यावी…*
*अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, जिल्हाधिकार्यांकडे मागणी…*
*सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष रत्नकांत कदम*
*सिंधुदुर्गनगरी,ता.५:*
दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे मायनिंग उत्खनन करण्यासाठी परवाना दिलेल्या दोन्ही कंपन्यांनी कळणे डोंगर भागात बेकायदेशीररीत्या उत्खनन केल्याने या डोंगराचा भाग कोसळून मायनिंग मधील चिखल आणि माती येथील गावातील नागरिकांच्या घरात, शेतात जावून नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना संबधित कंपन्यांकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी आणि या प्रकारास जबाबदार असणाऱ्या कंपन्या तसेच अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी .अशी मागणी सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष रत्नकांत कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे मायनिंग उत्खनन केले जाते. उत्खननाचा ठेका दोन कंपन्यांना देण्यात आला आहे. मात्र या कंपन्यांना देण्यात आलेले ठेके पुर्णपणे बेकायदेशीर विनापरवाणा केले आहेत. असे माहितीच्या अधिकारात मागितलेल्या महितीमधून स्पष्ट होत असल्याचे रत्नकांत कदम यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच २८ जुलै रोजी मांईन्सच्या डोगराचा भाग फुटून मांईनींग मधिल पाणी, चिखल व माती गावामध्ये शिरल्यामुळे गावकऱ्यांच्या जमिनीचे,घरांचे व पर्यावरणाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याला संबधित कंपन्यांकडून झालेले बेकायदेशीर उत्खनन कारणीभूत आहे. त्यामुळे जमिन मालकांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची कंपणीकडून जास्तीज जास्त नुकसान भरपाई मिळऊन देण्यात यावी. तसेच या प्रकारास जबाबदार असणाऱ्या कंपन्या व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष रत्नकांत कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
