*कोकण Express*
*चालकाचा ताबा सुटल्याने पेपर रोल घेऊन जाणारा ट्रक पलटी : एडगांव नजीक घटना*
चालकाचा ताबा सुटल्याने पेपर रोल भरलेला ट्रक एडगांव नजीक गटारात पलटी झाला आहे. या अपघातात ट्रक चालक व क्लीनर बालंबाल बचावले आहेत. या अपघाताची नोंद वैभववाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हा अपघात आज पहाटे 4 वा. सुमारास घडला आहे.
पुण्याहून गोव्याकडे पेपर रोल भरलेला ट्रक (नं. एमएच-12 एलटी- 4953) वैभववाडी मार्गे जात होता. पहाटे 4 च्या दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने व वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक रस्त्याकडेला गटारात पलटी झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर पेपर रोल चे नुकसान झाले आहे. ट्रक चे ही मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा अधिक तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.

