*मठ येथे उद्या गावदिंडीचे आयोजन*

*मठ येथे उद्या गावदिंडीचे आयोजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*मठ येथे उद्या गावदिंडीचे आयोजन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

मठ येथील श्री देव स्वयंभू मंदिराच्या हरिनाम सप्ताहानिमित्त रविवार दि. २३ रोजी गावदिंडीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी बहुसंख्य भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
मठ येथील श्री देव स्वयंभू देवस्थानचा वार्षिक हरिनाम सप्ताहाला नागपंचमीपासून (दि.१७ ऑगस्ट) प्रारंभ झाला आहे. या सप्ताहा कालावधीत मंदिरात रोज विविध संगीत व वारकरी भजनी मंडळांची भजने संपन्न होत आहे. या सप्ताहाच्या सातव्या दिवशी रविवारी गावदिंडीचे आयोजन केले आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता मठ तिठा येथून या गावदिंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या दिंडीमध्ये वेंगुर्ला येथील मूळपुरूष धावडेश्वेर मंडळाचे भजन, वेतोरे-मिरमेवाडी येथील श्री देव समंध मित्रमंडळाचा “कृष्णजन्म’ हा चित्ररथ असणार आहे. ही दिंडी ढोलताशांच्या गजरात भजन करत श्री देव स्वयंभू मंदिरात जाणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!