अंगणवाडीतील मुलांना शालेय गणवेशाचे वाटप

अंगणवाडीतील मुलांना शालेय गणवेशाचे वाटप

*कोंकण एक्सप्रेस*

*अंगणवाडीतील मुलांना शालेय गणवेशाचे वाटप*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्यावतीने १५ ऑगस्ट या दिवशी शहारातील बाळाजी सिताराम नाईक वेंगुर्ला नं.३ या शाळेतील अंगणवाडीतील मुलांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. अंगणवाडीच्या मुलांना शाळेत येताना एकसमान गणवेश उपलब्ध व्हावा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ज्योती देसाई, उपाध्यक्षर सई चव्हाण, सेक्रेटरी श्रीया परब, ट्रेझरर वृंदा गवंडळकर, मेंबर रसिका मठकर, हर्षदा शिरसाट, अंगणवाडी शिक्षिका सुनिता कांबळे यांच्यासह पालक उपस्थित होते. अंगणवाडीतील मुलांना शालेय गणवेश मिळावा यासाठी शिक्षिका सुनिता कांबळे यांनी इनरव्हील क्लबकडे मागणी केली होती. गणवेश उपलब्ध करून दिल्याबद्दल सुनिता कांबळे तसेच पालकांनी क्लबचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!