ओसरगाव तलावाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटीची मागणी जठार साहेब व मंत्री शंभूराज देसाई यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन

ओसरगाव तलावाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटीची मागणी जठार साहेब व मंत्री शंभूराज देसाई यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन

*कोंकण एक्सप्रेस*

*ओसरगाव तलावाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटीची मागणी*

*जठार साहेब व मंत्री शंभूराज देसाई यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन*

*ओसरगाव : प्रतिनिधी*

ओसरगाव तलाव परिसराच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून, या मागणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार प्रमोद सुनीता शांताराम जठार तसेच राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे ओसरगाव ग्रामस्थांच्या वतीने जाहीर अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

आमदार प्रमोद जठार यांनी दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामांना प्राधान्याने मंजुरी देण्याची मागणी केली आहे. या मागणीच्या यादीमध्ये कणकवली तालुक्यातील ओसरगाव तलाव परिसराच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ओसरगाव तलाव हा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असून, तलाव परिसराचा विकास व सुशोभीकरण झाल्यास स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. तलाव परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा निर्माण झाल्यास ओसरगावच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

गावाच्या विकासासाठी करण्यात आलेल्या या मागणीचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. “ओसरगाव तलावासाठी एक कोटी रुपयांच्या सुशोभीकरण निधीची मागणी केल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई साहेब आणि आमदार प्रमोद जठार साहेब यांचे संपूर्ण गावाच्या वतीने जाहीर अभिनंदन व मनःपूर्वक आभार,” अशी भावना ग्रामस्थ बबली राणे यांनी व्यक्त केली.

तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाल्यास ओसरगाव परिसराच्या पर्यटन विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!