*कोंकण एक्सप्रेस*
*ओसरगाव टोल बाबत पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, टोल व्यवस्थापन यांस निवेदन दिले*
* सिंधुदुर्ग नगरी*
मुंबई – गोवा महामार्ग आपल्या जिल्ह्यातून खारेपाटण – कणकवली – कुडाळ – सावंतवाडी – बांदा तें गोवा असा जातं असून
ओसरगाव कणकवली येथे महामार्ग प्राधिकरण यांनी टोलनाका उभारला आहे वं याठिकाणी IRB यां कंपनी व्यवस्थापन द्वारे टोल घेण्यात काल सोमवारी सकाळी टोल घेण्यात आला सदर ठिकाणी जिल्हा काँग्रेस पदाधिकारी यांनी जाऊन विचारणा केल्यावर.. टोल व्यवस्थापण चे श्री. आपटे यांनी हीं ट्रायल आहे असे सांगितले
त्यावर सुट्टीचा दिवस असल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी शांत बसले परंतु आज स्थानिक प्रशासनास पूर्व सूचना देत आज मंगळवारी ओसरगाव टोल कार्यालय येथे
जाऊन टोल ची जबरदस्ती जिल्हावासियांवर लादु नका अशी विनंती करत काही तांत्रिक बाबी वर चर्चा केली
यावर टोल चालू करणार नाही असे तोंडी सांगितले
आठवड्यात लेखी उत्तर देतो असे सांगितले
आजही यां महामार्गांवर अनेक ठिकाणी कामं अर्धवट स्तिथीत असून पूर्ण झालेले नाही
यापूर्वी देखील आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तसेच आपल्या कार्यालयास महामार्ग कामं अपूर्ण असल्यामुळे टोल घेऊ नये तसेच सदरचा टोल बाबत जिल्ह्याच्या वेशीवर व्यवस्था करावी असे पत्र दिल होत.
याची प्रत पत्रा सोबत दिली
आजही अनेक ठिकाणी महामार्ग कामे हीं पूर्ण झालेली नसून अर्धवट स्तिथीत आहेत
काही प्रमाणात दुरावस्था झाली असून महामार्ग अपूर्णांवस्थेत आहे
तरी देखील महामार्गवरील ओसरगाव याठिकाणी असलेला टोलनाका सुरु काल सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी सुरु करण्यात आला
याठिकाणी जिल्ह्यातील नागरिकां कडूनही टोल भरणा करून घेण्यात आला आहे
# महामार्ग अपुऱ्यावस्थेत आहे,
# जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे यामुळे यां टोलनाक्यावर यां पुढे देखील टोल घेतल्या मुळे जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारक नागरिकांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड सहन करावा लागणार आहे त्रासाला सामोरे जावं लागणार आहे,
# यां जागेवरील हा टोलनाका जिल्ह्याच्या वेशीवर नेल्यास नागरिकांना यां टोल च्या आर्थिक भुर्दंडा तुन वाचता येईल
#टोल कर्मचारी आणि स्थानिक वाहधारक यांत वाद निर्माण होऊ शकतो
सध्या गणेशोत्सव जवळ आला आहे अश्या धार्मिक सणाच्या वेळी महामार्ग प्राधिकरण आणि टोल वसुल करणारी IRB कंपनी व्यवस्थापन यांच्या चुकीच्या कार्य पद्धती मुळे वाद देखील निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते
कायदा सुरक्षेच्या दृष्टीने आपण यां प्राधिकरण आणि टोल वसुली व्यवस्थापन यांस त्वरित यां बाबत योग्य त्या सूचना द्याव्यात
आपण त्वरित यावर उपाय योजना कराव्यात आणि जिल्ह्यातील स्थानिक वाहन धारक नागरिकांवर होणारा अन्याय दूर करावा
हीं विनंती
महामार्ग कामं पूर्ण होई पर्यत टोल वसुली बंद ठेवण्यासाठी IRB कंपनीस सूचना द्याव्यात
अशी विनंती केली
जिल्ह्यातील नागरिकां कढुन होणारी टोलवसुली कालच थांबवण्यात आली याची माहिती आम्ही प्रशासनाला दिली
यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रकाश जैतापकर, देवानंद लुडबे, बाळू मेस्त्री, अतिश जेठे, जेम्स फर्नांडीस, महेश परब, सरदार ताजर वं इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

