*कोंकण एक्सप्रेस*
*नवीन कुर्ली येथे बस स्टॉप चा लोकार्पण सोहळा संपन्न*
*नवदुर्गा युवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम*
*फोंडाघाट : संजना हळदिवे*
आज नवीन कुर्ली येथे नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने गेले कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी निवारा शेड (बस स्टॉप) हे नवदुर्गा युवा मंडळाच्या प्रयत्नातून कै. शालिनी पिळणकर यांच्या स्मरणार्थ श्री अंकुश पिळणकर यांच्या सौजन्याने साकार झाले. या उपक्रमाचे गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले, या बस स्टॉप चे उद्घाटन श्री प्रफुल पिळणकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर सर्व पदाधिकारी, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाला नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांनी शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज हूंबे यांनी केले तर नवदुर्गा युवा मंडळाकडून आभार प्रशांत दळवी यांनी मानले.

