*कोंकण एक्सप्रेस*
*गांजा या अमली पदार्थाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या एकूण 3 आरोपींना 197 gram गांजा तसेच दोन मोटारसायकलसह ताब्यात घेतलेबाबत*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी पोलिस ठाणे हद्दीत कारीवडे बिलेवाडी येथे जंगलात एका पडक्या घराचे बाजूला काही इसम आज दिनांक 08/08/2026 रोजी गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेवरुण त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून दोन पंच व प्रमाणित वजनकाटाधारक यांना सोबत घेवून केलेल्या कार्यवाहीत आरोपी इसम नामे 1)सुनील श्रीकांत मुदगल, वय-26 वर्षे, रा.अनंत पॅलेसच्या पाठीमागे, कारिवडे पेडवेवाडी, ता. सावंतवाडी 2) अमर मारुती धोत्रे, वय-23 वर्षे, रा.कारिवडे पेडवेवाडी,ता.सावंतवाडी, 3) चंद्रप्रकाश पलठण प्रजापती, वय-34 वर्षे, रा.गवळीतिठा सावंतवाडी मूळ रा. भुसूडा उर्फ हनुमानगंज, जिल्हा बस्ती रा.उत्तरप्रदेश हे गांजा या अंमली पदार्थाची खरेदी विक्री करीत असताना त्यांना सापळा रचून जंगलमय भागातून शिताफीने त्यांच्याकडे असलेल्या दोन मोपेड मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 197 gram वजनाचा गांजा मिळून आला.
ताब्यात घेण्यात आलेला मुद्देमाल-
1) 6,000/- एक सफेद रंगाच्या प्लॅस्टीक पिशवीत हिरवट रंगाचा उग्रवास येत असलेला गांजा अंमली पदार्थ असून त्याचे वजनकाटाधारक याचेकडून वजन करून पाहिले असता ते प्लॅस्टीक पिशवीसह 197 ग्रॅम आहे.
2) 50,000/- एक निळ्या रंगाची यमाहा कंपनीची फसीनो दुचाकीतिच्या पुढे व मागे MH07AE4379 अशी नंबर प्लेट आहे. जुनी वापरती चावीससह किंसु.
3) 60,000/- एक ग्रे रंगाची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा दुचाकी तिच्या पुढे व मागे GA11B6274 अशी नंबर प्लेट आहे. जुनी वापरती चावीससह किंसु.
सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा. कु. नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ ,ASI सदानंद राणे, पोलिस हवालदार प्रकाश कदम, डॉमीनिक डिसोझा,राजेंद्र गोसावी, विल्सन डिसोझा,आशिष जामदार यांच्या पथकाने केलेली आहे.

