गुरुपौर्णिमेनिमित्त दहावी प्रथम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजन

गुरुपौर्णिमेनिमित्त दहावी प्रथम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*गुरुपौर्णिमेनिमित्त दहावी प्रथम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजन*

*कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि प उपाध्यक्ष दादा साईल , जि प सदस्य दीपलक्ष्मी पडते*

*सिधुदर्गनगरी*

सिधुदर्गनगरी आपण विद्यार्थ्यांनी मिळलेले यशआणि सद्गुरु च्या माध्यमातून आपला झालेला सत्कारमहत्त्वाचा असून ही गुरुदक्षिणा आपल्या उज्वल भवितव्यासाठी मार्गदर्शक दिशा देणारी ठरेल असे उद्गार जि प उपाध्यक्ष दादा साईल यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात काढलेयेथे साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त दहावी प्रथम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमआयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि प उपाध्यक्ष दादा साईल माझी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जि प सदस्य दीपलक्ष्मी पडते गावरान सरपंच सोनल शिरोडकर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पावसकर साई सेवा समितीचे संस्थापकीय सल्लगार शेखर वालावलकर सत्कार मुर्ती सेवानिवृतपोस्ट मास्तर गुरुनाथ शिरोडकरआदींसह ग्रामस्थ संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद माईनकर यांनी केले यावेळी नूतन जि प उपाध्यक्ष दादा साईल जि प सदस्य दीपलक्ष्मी पडते यांचातसेच सेवानिवृत्त पोस्टमास्तर गुरुनाथ शिरोडकर दांपत्याचा साई सेवा समितीच्या वतीनेसत्कार करण्यात आला
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला यामध्ये प्रथम रसिका अजित जंगले कावेरी संतोष परब पियुष अनिल काळसेकरआदींचा विद्यार्थ्यांना भेटवस्तू गुलाब पुष्प देऊन सत्कार केला,गुरु पौर्णिमेच्या या कार्यक्रमाच्या निमित्तअनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली आणि कार्यक्रमाला शोभा आणलीयानिमित्त साई मूर्तीवर अभिषेक सत्यनारायण महापूजा नामस्मरण भजन आदींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले
यावेळी बोलताना जि प उपाध्यक्ष दादा साईल म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा असून दरवर्षी कोकण विभागात प्रथम येण्याचा मान या जिल्ह्याने राखला आहे येथील विद्या मंदिर च्या माध्यमातून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा साई सेवा समितीच्या वतीने सत्कार केला हा या विद्यार्थ्यांना एक गुरुदक्षिणा आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या असून विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी आपला केलेल्या सत्कार लक्षात ठेवून यशस्वी वाटचाल करावी साई सेवा समितीच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रम महाआरती या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मला असाच भाग्य लागले त्याबद्दल मी यास मंडळाला शुभेच्छा आभार मानतो यापुढे सतत सहकार्य राहील असेही त्यांनी शुभेच्छा पर मार्गदर्शनात सांगितले


माझी जिल्हा परिषद अध्यक्ष दीप लक्ष्मी पडते म्हणाल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थीमहिला पुढे आहेत याही शाळेच्या निकालामध्ये दोन मुलींनीच पहिला दुसरा क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला आहे आज अनेक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हा प्रगतीवर जात आहे रोजगाराच्या तसेच अनेक संधी तरुण-तरुणींना विद्यार्थ्यांना विविध कला कौशल्य प्रशिक्षण यांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत या शाळेच्या विद्यार्थ्यांचा साई सेवा समितीच्या वतीने केलेला हा सत्कार सत्कारणी लावून आपले उज्वल भविष्य घडवावे आणि प्रगती साधावी असे विचार व्यक्त करताना साई सेवा समितीच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेता आला यात आपल्याला आनंद आहे यापुढेही असेच आपले सहकार्य राहील असेही त्या म्हणाल्या
गुरु पौर्णिमा आणि गुरुचे आचरण करणे हा या कार्यक्रमामुख्य उद्देश आहे आजच्या युगात नामस्मरण आणि सद्गुरु चे आचरण महत्त्वाचे आहे ते आपण प्रत्येक भक्ताने व्यक्तीने आचरण करून साई मंदिर च्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले आचरणात विचारात बदल घडवून आणावा गुरुची सेवा करून भक्तिमार्गाचा आनंद घ्यावा असेही माजी शिक्षक विनोद माईंणकर यांनी सांगितले शेवटी उपसितांचे आभार भाई राणे यांनी मानले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!