*कोंकण एक्सप्रेस*
*आम. दीपक केसरकर यांनी सावंतवाडी पोलीस लाईन येथील श्री औदुंबर स्वामी समर्थ मंदिरात घेतले स्वामींचे दर्शन*
*गुरुपौर्णिमे निमित्त उपस्थित राहून साधला संवाद.. !*
*सावंतवाडी : प्रतिनिधि*
गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वावर सावंतवाडी पोलीस लाईन परिसरातील श्री औदुंबर स्वामी समर्थ मंदिरात आयोजित विशेष गुरुपौर्णिमा महोत्सवास महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली आणि स्वामींचे आशीर्वाद घेतले.
मंदिरात पोहोचल्यानंतर उपस्थित विश्वस्त, स्थानिक नागरिक व स्वामी भक्तांच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांचे पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांची पाहणी केली आणि उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आमदार केसरकरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्यातील उत्साह आणखी वाढला. दिवसभरात मंदिरात महाअभिषेक, पोथीवाचन, महाआरती आणि महाप्रसाद वाटप यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शेकडो भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

