बाबा भालचंद्र महाराज यांच्या कनक नगरीत भव्य दिव्य सन्मान सोहळा

बाबा भालचंद्र महाराज यांच्या कनक नगरीत भव्य दिव्य सन्मान सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*बाबा भालचंद्र महाराज यांच्या कनक नगरीत भव्य दिव्य सन्मान सोहळा*

*कणकवली :संजना हळदिवे*

माऊली मित्र मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान कणकवली चे व्यवस्थापक श्री विजय केळुसकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला

आज दिनांक 29/07/2026 रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी बाबा भालचंद्र महाराज संस्थान च्या वतीने माऊली मित्र मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला

गुरू माऊली बाबा भालचंद्र महाराज यांच्या सर्वांगी पांघरलेली शाल बाबांचे सेवक श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या अंगी पांघरूण श्री विजय केळुसकर साहेब यांनी असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थित सन्मान केला

यावेळी परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान चे व्यवस्थापक श्री विजय केळुसकर यांनी, श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर निस्वार्थी भावनेने सदैव बाबा भालचंद्र महाराज यांच्या चरणी सेवा अर्पण करत असतात

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व माऊली मित्र मंडळ चे सर्वेसर्वा श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की, कोणतेही कार्य असो वा बाबांच्या ठायी सेवा असो आम्ही ती निस्वार्थी भावनेने च करत असतो, तेथे कोणताही अहंकारी भाव कधीही नसतो, आणि तो अहंकारी भाव आम्हाला आमच्या अंगी कधीही बाबांनी देवू हि नये असे हि ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!