*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ आंब्रड सारमळे व जांभवडे नरडवे या धरणांची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी*
*कुडाळ : प्रतिनिधी*
आज कुडाळ आंब्रड सारमळे व जांभवडे नरडवे या धरणांची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
मंत्रालयात जलसंधारण मंत्री श्री. संजयजी राठोड यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सिंचनाचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा व प्रलंबित कामांना गती मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. संजय पडते, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते, श्री. अरविंद करलकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

