जिओ नेटवर्कचा बोजवारा; ग्राहक संतप्त, सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी…

जिओ नेटवर्कचा बोजवारा; ग्राहक संतप्त, सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी…

*कोंकण एक्सप्रेस*

*जिओ नेटवर्कचा बोजवारा; ग्राहक संतप्त, सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी…*

*दोडामार्ग: शुभम गवस*

दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे, झरेबाबर, उसप, खोकरल तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जिओ मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नेटवर्क अवघ्या दोन मिनिटांसाठी येते आणि पुन्हा पूर्णपणे गायब होते. त्यामुळे हजारो जिओ ग्राहकांना कॉल, इंटरनेट आणि ऑनलाइन सेवांचा वापर करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, मोबाईलवर नेटवर्क काही क्षण दिसते, मात्र लगेच नाहीसे होते. त्यामुळे महत्त्वाचे फोन लागत नाहीत, इंटरनेट सेवा खंडित होते, ऑनलाइन व्यवहार, शासकीय कामे, बँकिंग, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण तसेच व्यावसायिक कामकाजावरही परिणाम होत आहे.
ग्रामीण भागात अनेक नागरिकांचा जिओवरच संपर्क अवलंबून असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. वारंवार नेटवर्क खंडित होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित कंपनीने या बिघाडाचे कारण स्पष्ट करून तातडीने नेटवर्क सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!