नवीन कुर्ली येथे एसटी महामंडळाचे सवलत कार्ड काढण्यासाठी विशेष कॅम्प

नवीन कुर्ली येथे एसटी महामंडळाचे सवलत कार्ड काढण्यासाठी विशेष कॅम्प

*कोंकण एक्सप्रेस*

*नवीन कुर्ली येथे एसटी महामंडळाचे सवलत कार्ड काढण्यासाठी विशेष कॅम्प*

*नवदुर्गा युवा मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक*

आज नवीन कुर्ली येथे प्राथमिक शाळेमध्ये महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाचे सवलत कार्ड काढण्याचा विशेष कॅम्प नवदुर्गा युवा मंडळाकडून आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामध्ये नवीन कुर्लीतील सुमारे १२५ महिलांनी व पुरुषांनी सहभाग नोंदविला.
एसटी महामंडळाचे सवलत कार्ड काढण्यासाठी इतर ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या असताना ग्रामस्थांना सवलत कार्ड सहज उपलब्ध होण्यासाठी हा कॅम्प नवीन कुर्ली मध्येच घेतल्यामुळे नवदुर्गा युवा मंडळाचे ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!