*कोंकण एक्सप्रेस*
*आचिर्णे येथे रविवार दि .१४/६/२०२६ रोजी १८ वा दुर्गाडी दर्शन सोहळा*
*वैभववाडी (प्रतिनिधी)*
वैभववाडी तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या आचिर्णे, लोरे, कुर्ली, अरुळे व खांबाळे या पाच गावातील दुर्गाडी डोंगराचे क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकासित व्हावे या उद्देशाने आचिर्णे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येवून दुर्गाडी विकास मंडळाची स्थापना केली. उद्देश पूर्तीसाठी मंडळ दरवर्षी पावसाळ्यात सहल आयोजित करते. सर्व पर्यटकांनी दिनांक 14/6/2026 रोजी सकाळी 12 वाजता आचिर्णे (धनगरवाडी) येथे एकत्रित व्हावे. ज्यांना वाहनाने यावयाचे आहे त्यांनी माळवाडी-मोईनवाडी मार्गे धनगरवाडी असा प्रवास करून येणे. ज्यांना पाई चालत यावयाचे आहे त्यांनी खरलावर गवळदेवाजवळ सकाळी 10 वाजता एकत्र जमावे.
पर्यटकांची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर पर्यटनाच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. देवराई येथील गांगो-हंगोबा, ब्राह्मण, रामेश्वर या देवांचे दर्शन घेऊन धनगरवाडी मार्गे दुर्गाडीच्या शिखरावर जाऊन तेथे न्याहरी करण्यात येईल. दुपारचे जेवण श्री. विठ्ठल हुंबे यांच्या घरी बनविण्यात येणार आहे. भोजनानंतर धनगरवाडी येथे कार्यक्रमाची सांगता होईल. पर्यटकांनी आपल्या सोबत पुरेसे पाणी, आधारासाठी काठी व सकाळची न्याहारी घेऊन यावे.
असे आवाहन दुर्गाडी विकास मंडळाचे अध्यक्ष श्री .गणेश रगुनाथ रावराणे यांच्या वतीने करण्यात आले आहे .

