*कोंकण एक्सप्रेस*
*जागतिक पर्यावरण दिनांनिमित्त विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत वृक्षारोपण*
*कणकवली ः संजना हळदिवे*
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सामाजिक वनिकरण व विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या पर्यावरण विभागामार्फत प्रशालेच्या आवारात जांभूळ झाडांची लागवड करण्यात आली. महत्वाचे म्हणजे या वर्षी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीने वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचे आदर्श घालून दिले या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी. जे. कांबळे सर यांच्याहस्तेही वृक्ष लागवड करण्यात आली पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी वृक्षलागवड केली सामाजिक वनिकरण विभागाचे सर्व अधिकारी यांनीही वृक्षारोपण करून पर्यावरण दिनांचा आदर्श घालून दिला प्रशालेचे पर्यावरण विभाग प्रमुख श्री प्रसाद राणेसर तसेचे एनसीसी विभाग प्रमुख श्री अमोल शेळके सर ग्रंथपाल श्री महानंद पवार सर पालक व एन सीसीचे विद्यार्थी उपस्थित होते

